Posts

अचलपूर: एक प्राचीन शहर

Image
माझं गाव: अचलपूर..!! अचलपूर..!! माझं गाव.. जेंव्हा मी "इतिहासाच्या पाऊलखुणा" या संदर्भात माहिती संकलित करण्याचे ठरवले, तेंव्हा सहजच सभोवताली नजर फिरवली तर काय..!! माझ्या आजूबाजूला पुरातन वास्तू , जुने आणि तेवढेच भक्कम बांधकाम, नक्षीकाम अश्या सर्व गोष्टींचा खजिनाच होता. आणि मग मी अचलपूर या गावाचा इतिहास Internet वर शोधण्यास सुरुवात केली. तर लक्षात आले की अचलपूर चा संदर्भ आणि या गावाशी निगडित इतिहासातील धागे-दोरे फार पुरातन आहेत, आणि तेवढेच ऐतिहासिक उलाढालींनी भरपूर आहेत. ढोबळमानाने पहिला असता अचलपूर शहराचा संदर्भ मध्यकाळात विशेषतः ९व्या शतकात मिळतो. इ. सन ९ ते इ. सन १२ या काळात अचलपूर हे जैन संस्कृतीच्या अधिपत्याखाली विकसित झाले होते. त्याआधी ८व्या शतकात काही काळासाठी अचलपूर हे "राष्ट्रकूट घराण्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. आचार्य जयसिंहसुरी यांनी यांनी इ. सन ९ मध्ये लिहिलेल्या धर्मोपदेशमला या ग्रंथात अचलपूरचे नरेश "अरिकेसरी " यांचा उल्लेख केला आहे. अजंता-एलोरा च्या गुफा बनवणारा राजा ईल [एल] यानेच अचलपूर शहराभोवती तटबंधी उभारून किल्ल्याच...

इतिहासाच्या पाऊलखुणा: प्रस्तावना

इतिहासाच्या पाऊलखुणा गोष्ट अगदी इतक्यातलीच आहे १२ ऑक्टोबर २०१९, चीनचे राष्ट्रपती Xi Jinping भारत दौऱ्यावर होते, दौऱ्यातील चर्चा आणि काही करारांवर साह्य होणार होत्या त्यासाठी ठिकाण ठरलं होतं ते म्हणजे तामिळनाडू राज्यातील मामल्लापुरम/ महाबलीपूरम हे गाव. वाचायला जरा वेगळा वाटलं होतं कारण आजवर बाहेरील देशातून आलेल्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यासाठी त्यामानाने कमी प्रचलित असणाऱ्या जागी नेण्याची ही माझ्या माहितीतली पहिलीच वेळ असावी . कारण आजवर नेहेमी हेच ऐकत वा पाहत आलोय की कोणताही अतिमहत्वाचा व्यक्ती आला की सहपरिवार त्याला "ताज महालाचे" दर्शन घडवले जाई. या लिंक वर Click करून अजून माहिती घ्या..!! . त्यामुळे या मोदी-जिनपिंग भेटीचे कौतुक देखील वाटले आणि ताज महाल मध्ये असं काय आहे जे बाकी भारतातील इतर मंदिर किंवा तत्सम वास्तूंमध्ये नाही याबद्दल कुतूहल देखील निर्माण झाले. या कुतुहलाचाच एक भाग म्हणून मी भारतातील प्राचीन, अतिप्राचीन कालपटावर पुसट होत गेलेल्या तसेच या देखाव्याच्या दुनियेत कुठेतरी पडद्याआड होत चाललेल्या मंदिरांचा, वास्तूंचा, ...

तेजस्वि नावधीतमस्तु:

Image
।। तेजस्वि नावधीतमस्तु: ।। -: सौ. वीणा अनंत भारतीय :- "बापरेरेरेरे.....!! आई, तू ५० वर्षांची झालीस ??", असे उद्दगार काढून मी, सायली आणि माई (माझी आई) जोर जोरात हसू लागलो. परवाचीच गोष्ट, पुण्याला येण्यासाठी आम्ही बडनेरा स्टेशनला गाडीची वाट बघत होतो, गाडीला यायला तसा बराच अवकाश होता, आणि बोलता-बोलता नकळतचं आमची एका छान आठवणींच्या सफारीला सुरुवात झाली. अत्तरदणीतुन अत्तराचा वर्षाव होताच जसं मन सुखावतं, अगदी तसाचं एक-एक आठवण, एक-एक किस्सा आठवताना मन प्रफुल्लित होत होतं. माझी आई म्हणजे माझा प्रेरणास्रोत, माझा विश्वास. ती तिच्या कर्तव्यांमध्ये जितकी प्रामाणिक व प्रखर आहे तेवढीच तिची माया सौम्य व मृदू आहे. कित्तेकदा तिचं प्रेम, दातृत्वं आमच्या समजण्या पलीकडचा असतं. म्हणतातना की दातृत्वं, मृदू भाषा, या शिकून येत नाहीत, तर त्या जन्मजात असाव्या लागतात. "दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता । अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः ॥ " गेल्या २८ वर्ष्यांच्या माझ्या आयुष्यात काही तीव्र चढाव-उतार आलेत, त्यांत माझी आई माझी काठी आणि माझी हिंमत बनून खंबीर पणाने माझ्या पाठीशी उभी ...

नज़्म-ए-उल्फ़त: Post-10

प्यासी जमीं को इंतजार था | काले बदलोंका || विरान गलियारें को इंतजार था | किसी कारवेंका || हम तो इनायत पहलेही कर चुके थे | हमें तो इंताजर था | उनके जवाब का || पानीकी बून्द कही टिकती नहीं | आजकल ईमानदारी कही दिखती नहीं || ख़रीददारो के मंडी में खड़ा हु मै | लेकिन कितनी भी बोली लागलो | कुछ चीजे है जो बिकती नहीं || वही लोग खामोश रहेते है | जिनके जमानेमे हुनर बोलते है || फिर कही दूर एक तारा पिघला है | फिर आज अन्धेरेको है || आज की रात तो होनी ही थी | क्योकि हमें आपका साथ मिला है ||

वाचनानुभव: "व्यक्ती आणि वल्ली"

Image
बटाट्याची चाळ हे पुस्तक संपताच मी अगदी उत्सुकतेने पु.ल यांच अजून एखादं पुस्तक मिळत का ? हे पाहू लागलो तेंव्हा दादांनी [दत्तात्रय भारतीय] मला "व्यक्ती आणि वल्ली" हे पुस्तक दिल. आयुष्यातल्या कित्तेक विसंगत अनुभवांना विनोदी शैलीने एक गांभीर्य प्रदान करून लिहिलेला व्यक्तिचित्रांचा संग्रह म्हणजेच व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक. मिश्किल शैली, निर्मळ विनोद यामुळेच आपण या पुस्तकाचे कधी होऊन जातो ते आपल्यालाच काळात नाही आणि पु. लं च्या प्रतिभेचा विस्तार आणि विनोद निर्माणातील मुक्त संचार या पुस्तकातून अनुभवता येतो. मला अत्यंत आवडलेल्या काही व्यक्तिरेखांमध्ये नारायण, नामु परीट, चितळे मास्तर, पेस्तन काका ह्या आहेत. नारायणची लग्न जमल्या पासून ते पूर्ण होई पर्यंतची खटपट असो वा नमु परिटाची दुसर्यांचा सादर चोरून घालण्याची सवय. चितळे मास्तरांनी लावलेल्या "एका ओळीत ८ अक्षरे" ची शिकवण खदखदून हसवते, पण चरित्र विश्लेषणाच्या शेवटाला त्यांच्या झिजलेल्या चपलांचे वाचून डोळ्याची कड ओलावते. आडवळणाने पु.ल बराच काही सांगून जातात. त्यांच्या लिखाणातला sarcasm पोट धरून हसायला लावतो, पण कधी कधी शेवटाल...

वाचनानुभव: "माझी जन्मठेप"

Image
अखंड तेजाचा धगधगता अग्निकुंड, अचाट बुद्धीमत्ता, अफाट सामर्थ्याचे प्रतिक आणि मातृभूमी बद्दल असलेले प्रचंड प्रेम म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. वि. दा. सावरकर लिखित माझी जन्मठेप यामध्ये सावरकरांना झालेल्या अमानवी शिक्षेचे, अनुभवांचे तसेच इंग्रजांच्या क्रूर मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे वर्णन केले आहे. काळे पाणी ही कादंबरी वाचल्यानंतर मी सावरकर लिखित पुस्तकांना वाचण्याचा सपाटा सुरु केला तसाही या पुस्तकाबद्दल मला आधीपासूनच आकर्षण होते. काही राजकीय पक्ष्यातील लोकांनी सावरकरांविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयन्त केला होता. अर्थात, अशाने महान व्यक्तिचे महत्व कमी होत नाही. अर्थातच पुलनी म्हटल्याप्रमाणे, सावरकरांचे विचार पचवणे अवघड आहे, त्याला सारासार विवेकबुद्धी आणि आकलन शक्ती हवी. माझ्या सारख्या शब्द किंकराने या पुस्तकाबद्दल लिहताना शब्द व भावना अपुऱ्या पडत आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी नाशिकच्या कलेक्टरच्या हत्येच्या कटामधे सहभाग असल्याच्या आरोपावरून ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा, तेही दूर अंदमानात. तिथेही एकत्र येऊन तुरुंगात होणाऱ्या अत्याचाराचा सामना त्यांनी केला. अतोनात शारीरिक परिश्रम व मानसिक खच...

वाचनानुभव: "Benjamin Franklin"

Image
"मारावे परी किर्तीरुपी उरावे..!!" या म्हणीला साजेसं जगणं इतका पण सोपं नसतं, खडतर आयुष्याला आकार देत देत स्वतः ला अमेरिकेच्या निर्माणातील ध्रुव तारा बनलेला ह्या अवलियाच्या जीवनपटाचे दर्शन घेताना त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची प्रचिती येते. फ्रँकलिनच्या लेखनात मला आढळले की फ्रँकलिन हा एक सन्माननीय माणूस आहे. आयुष्यातील सुरुवातीच्या काही धड्यांमुळे, ज्याचे त्याने या पुस्तकात तपशीलवार वर्णन केले आहे, यामुळे त्याने सन्मान मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी नैतिक सिद्धी मिळवण्याच्या आपल्या योजनेची रूपरेषा दिली. त्या गुणांना विकसित करण्यास मदत करण्यासाठी दररोजचे वेळापत्रक तयार केले. फ्रँकलिन हा एक प्रिंटर होता आपल्या आयुष्यावरील दृश्ये छापण्यासाठी त्याने आपल्या प्रेसचा वापर केला. हे वर्तमानपत्रे, पत्रके, पुस्तके, पंचांग आणि बरेच काही यासारखे भिन्न मार्गांनी दर्शविले. फ्रँकलिनबद्दल मला जे कौतुक वाटले ते म्हणजे त्याला एक उत्सुक कुतूहल होते. सर्वप्रथम, तो एक उत्सुक वाचक होता. तो नेहमी वाचण्यासाठी नवीन पुस्तक शोधायचा. त्याची वाचनाची आवड सबस्क्रिप्शन लायब्ररी प्रणाली...

नज़्म-ए-उल्फ़त: Post-9

कविता करताना काही शब्द । नकळत खाली सांडले ।। सांडलेल्या शब्दांना मी फक्त। सरळ रेषेत मांडले ।। त्यातले दोन शब्द अचानक । एकमेकांशी उगाच भांडले ।। आणि जागा बदलून स्वतःची । त्यांनी सुंदर यमक साधले ।। मन माझं कुठेतरी हरवलेलं । मात्र ते तुलाच शोधात होतं ।। तुला खरंच ओळखता नाही आलं । ते तुझ्यासाठीच झुरत होतं ।। आज वर वाहतोय । तुझ्याच सुसंग लयीत ।। तुझंच नाव येतंय । माझ्या प्रत्येक ओळीत ।। मनातल्या भावनांना उगाच वाट करून दिली । कालच आणलेली कोरी वही लगेचच भरली || बघता बघता नवा छंदच जडला मला । आज तीच वही वाचताना तुझी आठवण झाली ।।

वाचनानुभव: "मुसाफिर"

Image
धगधगत्या सूर्याने प्रकाश मिळतोच पण त्याच्या तेजाने अनेकांना त्रासही होतो, प्रकाश देण्यासाठी सूर्यच व्हावं असं जरूरी नाही, असच एक व्यक्तिमत्त्व ज्याने अगदी मवाळ पणती होऊन सर्वांना प्रकाश दिला ज्योतीने ज्योत प्रज्वलित करत प्रकाश सर्वदूर पसरवला, आणि कोणत्याही जवळच्या व्यक्तीला त्याचा त्रासही झाला नाही. ती पणती म्हणजे अच्युत गोडबोले. सोलापूरच्या एका छोट्याश्या गावात जन्मलेल्या या अवलियाची कहाणी म्हणजे मुसाफिर. हे पुस्तक वाचून माणूस जिद्दीने पेटला नाही तर नवलच. आयुष्यात आलेल्या सगळ्याच चांगल्या वाईट घटनांना उजाळा देत हे पुस्तक त्यांची एक जिद्दी, लढाऊ आणि शिकाऊ मनोवृत्तीची पोचपावती देते. लहानशा गावात वाढताना झालेले संस्कार, शिक्षणाचे विलक्षण वेड, स्वतःच्या अस्तित्वाची धडपड तसेच समाजाशी जोडली गेलेली एक नाळ, त्यातून प्रत्येक कलेविषयी, भाषेविषयी, संगीता विषयीचा आदर व भान त्यांना सगळ्यांपासून वेगळं बनवत. श्रीमंत बनवत व एक अवलिया कलाकाराची मोहर त्यांच्यावर आपोआपच उमटते. पुस्तकांप्रति प्रेम तसेच जीवनावर आणि मानवतेवर प्रेम त्यांची कहाणी अजुनच सुरेख बनवते. या पुस्तकात तुम्हाला जगण्याकडे पाहण्याचा एक...

वैसे तबियत से तो हम शायर है |

Image
Engineering झाल्या नंतर मी माझ्या IT career ची सुरुवात KPIT या company मधून as a Software Engineer म्हणून केली. पहिलीच कंपनी असल्या मुळे तिथून शिकण्यासारखं खूप काही होता सुदैवाने संपूर्ण team खूप छान, मन मिळवू आणि सांभाळून घेणारी होती, सर्व Managers समजून घेणारे होते, यातच काही काळ लोटला आणि एक दिवस एकमेकांच्या आवडी निवडींबद्दल बोलता बोलता माझ्या चारोळ्या आणि शेर-ओ-शायरी च्या छंदाबद्दल सर्वांना कळले सर्वांनी त्याचे कौतुकही केले आणि company मध्ये होणाऱ्या "Talentine" या कार्यक्रमात मला सहभागी होण्यासाठी convince केले. हा video त्या कार्यक्रमातील माझ्या performance चा आहे. college मधील मित्रांच्या घोळक्यातून थेट company तील इतक्या लोकांसमोर शायरी सादर करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती तरी सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी comfortably बोलू शकलो.