Posts

Showing posts from August, 2016

वाचनानुभव: "बटाट्याची चाळ"

Image
स्वतः च कौतुक म्हणून नाही, पण आजवर बऱ्याच लोकांनी मला माझ्या विनोद-बुद्धीचे तसेच सटीक बसणाऱ्या sarcastic पण मजेशीर बोलीचे कौतुक केले आहे, आणि compliments पण दिल्या आहेत. ही गोष्ट सांगण्याच तात्पर्य अस की या माझ्यातील शैलीमागे दोन व्यक्तींचा मोलाचा वाट आहे असा मी समजतो, एक म्हणजे पु.ल आणि दुसरे प्र.के अत्रे. हे दोघेही आपल्या मराठी साहित्य विश्वातील अढळ तारे आहेत. या दोघांबद्दल माहिती नाही असा एकही व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार नाही, आणि जर आढळलाच तर त्याने स्वतः चे किती मोठे नुकसान करून घेतले आहे हे त्याला देखील कळणार नाही. तर पु,ल यांच्या विषयी इथे सांगण्याचा कारण असा कि मी वाचलेला पु.ल लिखित बटाट्याची चाल हे पुस्तक. हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावून स्वतः मध्ये डोकावू पाहायला लावणारे पु.ल म्हणजे एक जादूगारचं आहेत. बटाट्याची चाळ हे पुस्तक हाती घेताच मी त्यात रमून गेलो. आज वर मी वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वात छोटी प्रस्तावना असणारं हे पुस्तक होता, किंबहुना प्रस्तावनेचा जाळ्यात वाचकांना अडकवून न ठेवता मूळ मुद्याची मजा घेता यावी असा पु.ल यांचा मानस असावा...!! १२ प्रकरणं असल...