वाचनानुभव: "बटाट्याची चाळ"



स्वतः च कौतुक म्हणून नाही, पण आजवर बऱ्याच लोकांनी मला माझ्या विनोद-बुद्धीचे तसेच सटीक बसणाऱ्या sarcastic पण मजेशीर बोलीचे कौतुक केले आहे, आणि compliments पण दिल्या आहेत. ही गोष्ट सांगण्याच तात्पर्य अस की या माझ्यातील शैलीमागे दोन व्यक्तींचा मोलाचा वाट आहे असा मी समजतो, एक म्हणजे पु.ल आणि दुसरे प्र.के अत्रे. हे दोघेही आपल्या मराठी साहित्य विश्वातील अढळ तारे आहेत. या दोघांबद्दल माहिती नाही असा एकही व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार नाही, आणि जर आढळलाच तर त्याने स्वतः चे किती मोठे नुकसान करून घेतले आहे हे त्याला देखील कळणार नाही.

तर पु,ल यांच्या विषयी इथे सांगण्याचा कारण असा कि मी वाचलेला पु.ल लिखित बटाट्याची चाल हे पुस्तक. हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावून स्वतः मध्ये डोकावू पाहायला लावणारे पु.ल म्हणजे एक जादूगारचं आहेत. बटाट्याची चाळ हे पुस्तक हाती घेताच मी त्यात रमून गेलो. आज वर मी वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वात छोटी प्रस्तावना असणारं हे पुस्तक होता, किंबहुना प्रस्तावनेचा जाळ्यात वाचकांना अडकवून न ठेवता मूळ मुद्याची मजा घेता यावी असा पु.ल यांचा मानस असावा...!!

१२ प्रकरणं असलेलं हे पुस्तक, इथे मी प्रकरणं म्हणालो, कारण एकदा पु.ल यांच्या विषयी एक विनोद ऐकलं होता, तोच असा की.. "प्रकरण म्हटलं पु.ल अगदी त्यांच्या विशेष शैलीत त्याच सविस्तर वर्णन करू शकतात...!!" यातील काही प्रकरणं मजेदार आणि नेहेमी आठवणीत राहणारे आहेत. "सांस्कृतिक शिष्टमंडळ" यात विविध व्यक्तिरेखांचा संदर्भ देत आपल्याही अवती-भोवती असे इरसाल नमुने असतात याची कल्पना येऊन सहजच गालावर हसू येतं.

सर्वांसाठी गच्ची खुली झाल्यावर ती आपलीच कशी होईल यासाठी केलेल्या उठाठेवीची मज्जा "गच्चीसह-झालीच पाहिजे" या प्रकरणात वाचायला मिळत. dieting चं fad हे अलीकडच्या काळातच खूप पाहायला मिळत पण चाळीतील पंत जेंव्हा dieting अर्थात जेवणावर लंघन घालतात आणि त्याचा जो फज्जा उडतो तो या पुस्तकात अजूनच हास्याचे फवारे उडवतो.

वर म्ह्टल्याप्रमाणेच पु.ल चं लिखाण हे निखळ हसवणारं असता तेवढाच आत्मचिंतनात टाकणारं सुद्धा असतं. याचाच प्रत्यय म्हणजे पुस्तकाच शेवटचा प्रकरण "एक चिंतन" यात चालीची पूर्वीची आणि आताची परस्थिती यावर ते जे लिहितात ते मनाला रुख रुख लावुन जातं.

Comments