Posts

Showing posts from January, 2017

वाचनानुभव: "अग्निपंख"

Image
louise carroll नावाचा लेखक असा म्हणतो की कौशल्य, ध्येय आणि द्वेष विवेकाने त्यांची तहान भागवावी जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती, तिमिर बनत नाही प्रकाश, चूक बनत नाही बरोबर तोपर्यंत. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे कि आपण एखाद्या गोष्टीची निर्मिती करतो, एखाद्या गोष्टीचा विध्वंस करतो, त्यागोष्टीचे अंतिम स्वरूप काय असेल याची कोणालाही कल्पना नसते. धर्मग्रंथातील या तत्त्वज्ञानाची मर्यादा तितकीच नाही आहे, त्यांची मर्यादा ही आकाशाला गवसणी घालणाऱ्या माणसाच्या महत्वाकांक्षेपलीकडची आहे. डॉ . ए.पी.जे अब्दुल कलाम एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी प्रत्येक भारतीय मनाला आकाशाच्या पलीकडचा स्वप्न दाखवला आणि जागायलाही शिकवलं. एक असा माणूस ज्याने प्रत्येक भारतीय तरुणाला प्रयत्नशील आणि विवेकवादी बनवलं, तसाच अचाट अशी अवकाशभरारी घेत संपूर्ण जगाला अवाक केलं "अग्निपंख " हे त्यांचं आत्मचरित्र. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम या गावी अतिसाधारण कुटुंबातील जन्म ते भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान या त्यांच्या गरुडझेपेवर आधारित हे पुस्तक आहे. आजच्या चढाओढीच्या काळात एक निष्कलंकीत राजकारणी म्हणून जशी...