Posts

Showing posts from January, 2020

इतिहासाच्या पाऊलखुणा: प्रस्तावना

इतिहासाच्या पाऊलखुणा गोष्ट अगदी इतक्यातलीच आहे १२ ऑक्टोबर २०१९, चीनचे राष्ट्रपती Xi Jinping भारत दौऱ्यावर होते, दौऱ्यातील चर्चा आणि काही करारांवर साह्य होणार होत्या त्यासाठी ठिकाण ठरलं होतं ते म्हणजे तामिळनाडू राज्यातील मामल्लापुरम/ महाबलीपूरम हे गाव. वाचायला जरा वेगळा वाटलं होतं कारण आजवर बाहेरील देशातून आलेल्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यासाठी त्यामानाने कमी प्रचलित असणाऱ्या जागी नेण्याची ही माझ्या माहितीतली पहिलीच वेळ असावी . कारण आजवर नेहेमी हेच ऐकत वा पाहत आलोय की कोणताही अतिमहत्वाचा व्यक्ती आला की सहपरिवार त्याला "ताज महालाचे" दर्शन घडवले जाई. या लिंक वर Click करून अजून माहिती घ्या..!! . त्यामुळे या मोदी-जिनपिंग भेटीचे कौतुक देखील वाटले आणि ताज महाल मध्ये असं काय आहे जे बाकी भारतातील इतर मंदिर किंवा तत्सम वास्तूंमध्ये नाही याबद्दल कुतूहल देखील निर्माण झाले. या कुतुहलाचाच एक भाग म्हणून मी भारतातील प्राचीन, अतिप्राचीन कालपटावर पुसट होत गेलेल्या तसेच या देखाव्याच्या दुनियेत कुठेतरी पडद्याआड होत चाललेल्या मंदिरांचा, वास्तूंचा, ...