नज़्म-ए-उल्फ़त: Post-9
कविता करताना काही शब्द ।
नकळत खाली सांडले ।।
सांडलेल्या शब्दांना मी फक्त।
सरळ रेषेत मांडले ।।
त्यातले दोन शब्द अचानक ।
एकमेकांशी उगाच भांडले ।।
आणि जागा बदलून स्वतःची ।
त्यांनी सुंदर यमक साधले ।।
मन माझं कुठेतरी हरवलेलं ।
मात्र ते तुलाच शोधात होतं ।।
तुला खरंच ओळखता नाही आलं ।
ते तुझ्यासाठीच झुरत होतं ।।
आज वर वाहतोय ।
तुझ्याच सुसंग लयीत ।।
तुझंच नाव येतंय ।
माझ्या प्रत्येक ओळीत ।।
मनातल्या भावनांना उगाच वाट करून दिली ।
कालच आणलेली कोरी वही लगेचच भरली ||
बघता बघता नवा छंदच जडला मला ।
आज तीच वही वाचताना तुझी आठवण झाली ।।
Comments
Post a Comment