नज़्म-ए-उल्फ़त: Post-5
एकदातरी उडावं पंख नसतांनाही ।
एकदातरी हसावं कारण नसतांनाही ।।
आपले लोक तर असतातच आपल्याजवळ ।
पण उगी आठवण काढावी कारण नसतांनाही ।।
स्वतः च्या परीनं जगण्याची ।
इथं प्रत्येकास संधी नसते ।।
प्रत्येक झाडाच्या नियती इथं ।
हिरवीगार फांदी नसते ।।
कुणास ठाऊक लोक प्रेम का करतात ।
प्रेमाची वाट सर्वांसाठी सारखी नसते ।।
खरी होती जर प्रीत तुझी ।
का केली नाहीस तू व्यक्तं ।।
सदा वाट बघण्यात तुझ्यी ।
आटले माझ्या देहातले रक्तं ।।
निः शब्द जाहलो मी ।
पाहून तुझे हे रूपं ।।
आता फुलले शब्द माझे ।
अन आला नवा हुरूप ।।
Comments
Post a Comment