वाचनानुभव" "तोत्तोचान"
मला आजही आठवत आई हे पुस्तक वाचत होती आणि मला म्हणे की "माझं झाला वाचून कि तू पण वाच.!", पण पुस्तकावरच मुलीच चित्र पाहून मला ते मुलींसाठीच असेल हे पुस्तक तरी आई मला का वाचायला लावते आहे..!! असा विचार करून मी नाक मुरुडला. पण नकारघंटा देत हाती घेतलेलं हे पुस्तक वाचता वाचता त्याच्या प्रेमातच पडलो..!! त्याला कारणही तसंच होतं. "तेत्सुकी कुरोयानागी" यांनी लिहिलेल्या जवळपास ३५० पानांच्या पुस्तकाचा अनुवाद करताना "चेतना सरदेशमुख-गोसावी" यांनी जपान व तेथील जगप्रसिद्ध शिक्षण प्रणालीच खूप सुंदर, भावनिक आणि तेवढंच रंजक असं वर्णन केला आहे.
काही अघटित कारणांमुळे कोणत्याच शाळेला नको असलेल्या तोत्तोचान नावाच्या एका छोट्या मुलीची ही गोष्ट आहे. बऱ्याच शाळांमधून प्रवेशासाठी नकारार्थी सूर मिळाल्यानंतर "तोमोई" नावाच्या शाळेतील तिचा प्रवेश आणि शाळेतील मुख्याध्यापकांनी तिच्या अवघड परिस्थितीचा विचार करत तिचे व्यक्तिमत्व कसे घडवले याचे सुंदर व हृदयस्पर्शी वर्णन आहे.
तोमोई शाळेबद्दलचे वर्णन वाचताना शाळेप्रती असणाऱ्या भावना अजूनच दृढ झाल्या आणि त्या शाळेबद्दल कुतूहलही वाढले, तोमोई शाळा हि झुक झुक गाडीच्या डब्यांमध्ये भरायची, आहार संबंधी नियम घालून देताना सर्वसमावेशकतेचा आग्रह धरला जाई, तसेच नुसत्या पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देण्याचे महत्वपूर्ण काम ही शाळा करत. त्यात संगीत, विविध खेळ, extracurricular activities यांचा समावेश असत.
या पुस्तकात एक अतिसामान्य मुलगी ते जपान मधील एकेकाळची नामवंत कलाकार या अफाट अश्या प्रवासात लहानपणी शाळेत मिळालेली शिकवण कश्याप्रकारे प्रभाव टाकू शकते याचे सुंदर वर्णन आहे. पुस्तक वाचताना काळजी, दया, उत्सुकता, जबाबदारी अश्या अनेक भावनांची रेलचेल मनात होते, आणि आयुष्यात येणाऱ्या संकटांना सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळण्यात आजही या पुस्तकाची मदत होते

Comments
Post a Comment