वाचनानुभव: "माझे जीवन - हेलन केलर"

"वाचाल तर वाचाल..!!" ही म्हण तशी लहानपणीपासूनच माझ्या मनावर बिंबवल्या गेली होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते. घरात सर्व शिक्षकी पेशाचे वातावरण, आई, बाबा, काका [दादा] यांना असलेली वाचनाची आवड, सोबतीला होता तो विविध पुस्तकांनी भरलेला ग्रंथसाठा, इथूनच पुस्तक वाचनाचे अंकुर माझ्यात रुजत गेले. ५वी-६वी ची गोष्ट असेल तेंव्हा चंपक, चाचा चौधरी, विक्रम-वेताळ, जंगलबुक अश्या हलक्या-फुलक्या गोष्टींची पुस्तक चाळून झाली होती , आणि तेंव्हाच आईने माझ्या हाती "हेलन केलर- माझे जीवन" हे पुस्तक दिला. इसापनीती, आत-पाट गावच्या काल्पनिक गोष्टींतून डोकं वर काढून अचानक एखादा व्यक्ती विषयी केंद्रित असलेला पुस्तक वाचण्याची ही माझी पहिलीच वेळ. पुस्तक तर घेतला हाती पण वाचन थोडा जड जात होता, "हेलन केलर- माझे जीवन" अर्थात "The Story of My Life" या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद होता त्यामुळे त्यावयात बरेचशे शब्द डोक्यावरून जात होते, पण तरीही पुस्तक वाचनाचा सपाटा सुरूच ठेवला. पुस्तकाचा मध्य गाठेस्तोवर एक वेगळेच आकर्षण वाटू लागल होत. ज्या पद्धतीने पुस्तकातील प्रसंगांचे वर्णन केले होते ते वाचण्यास जेवढे रोचक होते तेवढेच थरारक सुद्धा होते. त्यांना झालेला दुर्धर आजार, त्या आजारात आलेले अंधत्व आणि बहिरेपण यांवर मात करत त्यांनी Cambridge University मधून Arts ची Degree घेतली आणि पहिल्या अंध-बधिर महिला B.A होण्याचा मान मिळवला. हे सर्व वर्णन वाचून अंगावर शाररिक आले होते. जरी हे पुस्तक वाचायला मला बराच वेळ लागला होता तरी त्यातून हेलन केलर यांच्या जीवनपटला पाहून मिळालेला प्रोत्साहन, शिकवण खूप मोलाची होती, आणि अश्या प्रकारे माझ्या "Some Kind of Serious" वाचनवारीला सुरुवात झाली.

Comments